Wednesday, November 9, 2011
पाहिले न तुजला कधी .....
पाहिले न तुजला कधी
माझी परी तू सावली..
शोधितो मीच मजला
का देहात अशी सामावाली..
बोलणे लटके तुझे
का, कसे हटके असे
मोकळा होवुनी गुंततो मी
का, मन झाले वेडेपिसे...
सांग ना ग कोण तू
बहरले का ऋतू
गंध तू कुसुमातला
का कस्तुरी सुवास तू..
डोळ्यांतली आस तू
का खुळी प्रीत तू..
अनोळखी, का ओळखीची
गूढ सखे हे खोल तू....
प्रेम करणारे अनेक असतात...
आपल्या वर प्रेम करणारे अनेक असतात ,
आपण ज्यावर प्रेम करू असे कमीच दिसतात..
प्रेमाची व्याख्या प्रत्येकाची वेगळी असते...
प्रेम म्हणजे काय असते हे पण काहींना माहीत नसते..
निरागस.. शुद्ध प्रेम मिळण्याची भावना मनात असते पण सगळ्यांनाच त्याची कदर नसते..
एकच असतो असा कोणी तरी जो ओवतो प्रेमाचे मणी..
बांधतो निखळ प्रेमाची गाठ आणि देतो आयुष्यभर साथ...
परक्यांनाही आपलसं करतील असे गोड शब्द असतात,
शब्दांनाही कोड पडावं अशी काही गोड माणसं असतात,
किती मोठं भाग्य असतं जेव्हा ती आपली असतात.......!!!!
एक खरी गोष्ट : हे खरे प्रेम आहे
एक खरी गोष्ट :
एक मुलगा असतो तो एका मुलीवरती प्रेम करत होता!
एक दिवशी त्या मुलाने त्या मुलीला प्रपोस केले!
त्यावर ती मुलगी म्हणाली तुझ्या महिन्याचा पगार माझा एक दिवसाचा खर्च आहे. त्यामुळे मी तुझ्यावर प्रेम करू शकत नाही!
तरी सुद्धा तो मुलगा तिच्यावर खूप प्रेम करत असतो.
१० वर्षानंतर ते दोघे एका शॉपिंग मार्केट मध्ये भेटतात.
मुलगी तिच्या मुलाला म्हणते हे तुझे मामा आहेत.
मुलीने त्या मुलाला सांगितले माझ...े हे (नवरा) खूप मोठ्या कंपनी मध्ये काम करतात.
माझ्या नवर्याचा पगार १.५ लाख रुपये महिन्याला आहे.
थोड्याच वेळात तिचा नवरा येतो.
आणि तो म्हणतो सर आपण येथे! तो आपल्या बायकोला वोळख करून देतो हे माझे साहेब आहेत.
यांचा एका वर्षाचा टर्न ओवर २००० कॅरोड रुपये आहे.
आणि सर गेल्यावर तो आपल्या बायकोला सांगतो.
हे एका मुलीवर खूप प्रेम करतात.
त्यसाठी त्यांनी अजून लग्न केले नाही! नंतर त्या मुलीला खूप रडू आले.
(हे खरे प्रेम आहे)
..............!!!
'' गेले ते दिवस '' ''राहील्या त्या फक्त आठवणी "
नशीबवान तर सगळेच असतात
नशीबाला बदलणारा एखादाच असतो
हसतमुख तर सगळेच असतात
दुसर्याला हसवणारा एखादाच असतो
मर्त्य तर सगळेच असतात
... कर्तुत्ववान अमर एखादाच असतो
चमकणारे कजवे बरेच असतात
प्रखरतेने उजळणारा एखादाच असतो
सुखचे सोबती सर्वच असतात
दुःखचा साथीदार एखादाच असतो
अनुभवाने शहाणे बरेच असतात
अनुभवालाही शाहाणा करणारा एखादाच असतो
जाळणारे बरेच असतात
मेणबत्तीप्रमाणे जळणारा एखादाच असतो.......
Subscribe to:
Posts (Atom)