Wednesday, November 9, 2011

प्रेम करणारे अनेक असतात...

आपल्या वर प्रेम करणारे अनेक असतात ,
आपण ज्यावर प्रेम करू असे कमीच दिसतात..
प्रेमाची व्याख्या प्रत्येकाची वेगळी असते...
प्रेम म्हणजे काय असते हे पण काहींना माहीत नसते..
निरागस.. शुद्ध प्रेम मिळण्याची भावना मनात असते पण सगळ्यांनाच त्याची कदर नसते..
एकच असतो असा कोणी तरी जो ओवतो प्रेमाचे मणी..
बांधतो निखळ प्रेमाची गाठ आणि देतो आयुष्यभर साथ...
परक्यांनाही आपलसं करतील असे गोड शब्द असतात,
शब्दांनाही कोड पडावं अशी काही गोड माणसं असतात,
किती मोठं भाग्य असतं जेव्हा ती आपली असतात.......!!!!

No comments:

Post a Comment